माझी बरेच दिवसांपासून अशी इच्छा होती की मराठी मध्ये थोडे लिखाण करावे. पण प्रश्न होता तो लिपी चा. मला कॉम्पुटर वर मराठी लिहिता येत नाही कारण मराठी की बोर्ड अवघड आहे.
ब्लोग्गिंग करत असतांना माझी नजर मराठी फोंट वर गेली. विचार केला वापरून बघावे जमते का म्हणून. तसे केले असता काय आश्चर्य पटापट मराठी फोंट उमटायला लागले. परमानंद झाला.
आता विषयाकडे वळू. मला असे ठाम वाटते कि ज्या प्रमाणे स्वामी रामदेव जी यांनी योग आणि आयुर्वेद लोकांपर्यंत नेला तसे कुणी तरी लोकांपर्यंत होमिओप्याथी घेऊन जावी. म्हणून मी हा ब्लोग प्रपंच सुरु केला.
होमिओ पथी मध्ये लक्षणांच्या आधारावर औषध दिले जाते. चुका ह्या एलोप्याथी चे अंधानुकरण केल्यानी होतात. एलोप्याथी मध्ये आजारावर औषध आहे. होमिओप्याथी मध्ये माणसाच्या आजारावर औषध नसून आजारातल्या माणसावर औषध आहे.
No comments:
Post a Comment